आपल्यावर हल्ला झाल्यास प्रशासनासह अडकमोल जबाबदार – गुप्ता

जळगाव : जळगाव येथील सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे पोलिस सरंक्षण काढण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेले रिपाईचे साखळी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. गेल्या 7 जानेवारी पासून हे आंदोलन सुरु होते. दीपककुमार गुप्ता यांच्या पोलिस संरक्षणाबाबत लवकरच पुनरावलोकन केले जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी रिपाई पदाधिका-यांसमवेत चर्चा करतांना म्हटले आहे. उपोषण सोडवण्याबाबत जिल्हाधिका-यांनी लेखी पत्र दिले आहे.

याप्रकरणी दीपककुमार गुप्ता यांच्याशी “क्राईम दुनिया” ने संपर्क साधला. आपल्यावर हल्ला होण्याच्या हेतूने आपले पोलिस सरंक्षण काढण्याची मागणी केली जात असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. आपले सरंक्षण काढल्यानंतर आपल्यावर असमाजीक घटकाकडून हल्ला झाल्यास त्यास प्रशासनासह अनिल अडकमोल जबाबदार राहणार आहे. रेशन घोटाळा उघडकीस आणल्यामुळे आपल्या विरुद्ध आंदोलन छेडण्यात आले. प्रशासनाकडून दोषी ठरवण्यात आलेल्या 143 रेशन दुकानदारांपैकी 37 बड्या रेशन दुकानदारांविरुद्ध आपण प्रशासनाकडे आवाज उचलला. त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. 27 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिका-यांनी या 37 बड्या घोटाळेबाज रेशन दुकानदारांच्या फेर चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागितला होता. मात्र अद्याप प्रशासनाकडून त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. एकंदरीत प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांचा बचाव केला जात असल्याचे दिसून येत असल्याचे गुप्ता यांनी “क्राईम दुनिया” सोबत बोलतांना म्हटले आहे. याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील दीपककुमार गुप्ता यांनी पुढे बोलतांना म्हटले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here