देशी दारु दुकानातून दोन लाखाची रक्कम लंपास

जळगाव : जळगाव -औरंगाबाद मार्गावर सुप्रिम कॉलनी परिसरातील देशी दारुच्या दुकानातून लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. गोडाऊनमार्गे दुकानात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने हा प्रकार केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

भुपेश प्रकाश कुलकर्णी (रा. देवेद्र नगर जळगाव) हे सुप्रिम कॉलनी परिसरात देशी दारु दुकानाचा कारभार बघतात. त्यांच्या अख्त्यारीत सुरु असलेल्या दुकानात कॅशीअरसह काही जण कामाला आहेत. नेहमीप्रमणे 25 मार्च रोजी सायंकाळी त्यांनी कॅशीअरकडून दैनंदीन व्यवहाराचा हिशेब घेतला. रात्री व्यवस्थित दुकान बंद करण्याच्या सुचना कॅशीअरला दिल्यानंतर ते घरी निघून गेले. त्यानंतर 26 मार्चच्या सकाळी गोडाऊनचे लॉक तुटले असल्याचे कॅशिअरच्या लक्षात आले. याबाबत भुपेश कुलकर्णी यांना कळवण्यात आले. चोरट्याने गोडाऊनमार्गे दुकानात प्रवेश करुन 2 लाख 15 हजार 510 रुपयांची चोरी केल्याचे दिसून आले. याप्रकरणी पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे.कॉ. रामकृष्ण पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here