सेना प्रमुखांविरुद्ध पोस्ट टाकणा-यास पब्लिक मार

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या तरुणास बेदम चोप अर्थात पब्लिक मार दिल्याची घटना आज जळगाव शहरात घडली. शहरातील खानदेश मॉल परिसरात हा प्रकार आज दुपारी घडला. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

धरणगाव येथील हेमंत दुधिया असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते. संतापलेल्या शिवसैनिकांसह महिला कार्यकर्त्यांनी या तरुणाला गाठून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी रा.कॉ.ला युतीची ऑफर दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली. या मुद्द्याला धरुन फेसबुकवर शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रा.कॉ. सुप्रिमो शरद पवार यांच्याबद्दल एक पोस्ट या तरुणाने टाकली होती. या पोस्टमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांसह महिला सेना कार्यकर्त्यांनी त्यास पब्लिक मार दिला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here