अमरावतीत ‘आयपीएल’च्या सट्ट्यावर पुन्हा कारवाई

अमरावती : पोलिस आयुक्तांच्या पथकाने नांदगाव पेठ पोलिस स्टेशन हद्दीत अनुराधा कॉलनीत सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावरील सट्ट्यावर कारवाई केली आहे. सलग दुस-या दिवशी आयपीएल सट्टयावर झालेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र दुलीचंद साहु (38), नीलेश लखनलाल शाहु (43) व लकी अशोक शाहु (36) तिघे रा. मसानगंज, अमरावती अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. अटकेतील तिघांकडून 1 लाख 28 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या पथकातील स.पो.नि. योगेश इंगळे, सुभाष पाटील, जहिर शेख, रंजीत गावंडे, रोशन वरहाडे, सुरज चव्हाण, राजीक रायलीवाले, निखिल गेडाम यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील कारवाईकामी तिघांना नांदगाव पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here