वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह नेला फरपटत

jain-advt

उस्मानाबाद : मुलीच्या लग्नासाठी जमीन विकल्याचा राग मनात ठेवत मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या करुन मृतदेह सुमारे पन्नास मिटर फरफटत नेल्याची घटना उघडकीस आली असून खळबळ माजली आहे. एवढे झाल्यानंतर मृतदेह विहीरीत टाकत असल्याचे नातेवाईकाच्या लक्षात आले. कळंब तालुक्यातील कोथळा या गावी सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी शिरढोणा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथळा येथील अच्युत भागवत शिंदे यांनी मुलींच्या लग्नात खर्चासाठी जमीन विकली होती. तसेच त्यांना मद्यपान करण्याची सवय जडली होती. वडीलांच्या या कृत्याचा राग मनात ठेवत मुलगा सागर याने त्यांच्याशी वाद घालत त्यांची डोक्यात लोखंडी पाईप मारुन हत्या केली. या घटनेप्रकरणी चुलते अशोक शिंदे यांनी संशयीत आरोपी सागर अच्युत शिंदे याच्याविरुद्ध शिराढोण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. वैभव नेटके, पोलिस नाईक शौकत पठाण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here