शिकवणी घेणारा शिक्षकच आता बिघडला!— विद्यार्थिनीला व्हिडीओ कॉल करुन अडकला

अमरावती : सोळा वर्षाच्या विद्यार्थीनीची शिकवणी घेणा-या तसेच तिला वेळोवेळी व्हिडीओ कॉल व अत्याचार करणा-या तरुणाविरुद्ध अमरावती येथील गाडगेनगर पोलिस स्टेशनला बलात्कार, पोस्कोसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल भास्करराव शिंदे (38) रा. तपोवन अमरावती असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुणे येथील एका शिक्षीकेचा अल्पवयीन विद्यार्थ्याने आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केल्याची घटना ताजी असतांना सदर घटना देखील उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

सुरुवातीला याप्रकरणी अतुल शिंदे याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. मात्र कोतवाली पोलिसांनी शिंदे याच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्हची पाहणी केली असता त्यात सोळा वर्षाच्या विद्यार्थीनीसोबत त्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे उघडकीस आले. अत्याचाराचे घटनास्थळ गाडगेनगर पोलिस स्टेशन हद्दीत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध तेथे बलात्कार, पोस्को व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे. तो सहा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here