लग्नाच्या तिसऱ्या रात्री नववधू दागिन्यांसह पसार

jain-advt

हिंगोली :  लग्नाच्या तिस-या रात्री रोख रकमेसह दागिने घेऊन पसार होणा-या नववधूसह पाच जणांविरुद्ध पारध पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तुकाराम शिंदे, सुनीता शिंदे (जालना), सोनू दिलीप जाधव, दिलीप जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या शेलूद या गावातील तरुणासोबत हिंगोली जिल्ह्यातील तरुणीचे लग्न झाले होते. रात्रीच्या वेळी ती नववधू रोख रकमेसह दागिने असा अंदाजे तिन लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याने खळबळ माजली आहे. सर्व संशयीत फरार असून पोलिस पथक त्यांच्या मागावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here