तलवार घेण्यासाठी अधिकाऱ्याचा मुलगा येताच पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिका-याचा उच्चशिक्षीत मुलगा कुरिअर कार्यालयात ऑनलाईन मागवलेल्या तलवारीचे पार्सल घेण्यासाठी येताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अजिंक्य कैलास चक्रे (जटवाडा रोड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अजिंक्य चक्रे याने 2800 रुपयात ऑनलाईन तलावार बुक केली होती.

 काही दिवसांपुर्वी औरंगाबादला 37 तलवारी आणी एक कुकरी असा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर घटना ताजी असतांना आता पुण्यातील डीटीडीसी कुरीअर कार्यालयातून देखील तलवारींचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. पुण्यात पकडण्यात आलेल्या तलवारी औरंगाबादसह नगर येथे जाणार होत्या. पंजाब – पुणे – औरंगाबाद व नगर असा तलवारींचा प्रवास होत असल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे. पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्यासह उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे, नरेंद्र गुजर, मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी आणि हनुमंत चाळणेवाड आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here