एलसीबी पथकाच्या कौशल्याने खूनाच्या आरोपीस अटक

जळगाव : जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात 4 एप्रिल रोजी खूनाची घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात संशयित आरोपीस अटक करण्याकामी एलसीबी पथकाचे कौशल्य दिसून आले आहे. याच परिसरात काही दिवसांपुर्वी खूनाची एक घटना घडली होती. त्या घटनेतील आरोपीला देखील काही तासातच एलसीबी पथकातील चौघांनी अटक करण्यात आपले कसब दाखवले होते. एलसीबी पथकाचे सुप्रिमो पो.नि. किरणकुमार बकाले यांचे मार्गदर्शन यामागे लपलेले असते. अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची योग्य प्रमाणातीलस सांगड अर्थात टीमवर्कचे संयोजन जुळून आल्यानेच तपासकामाला वेग येत असतो. पोलिस अधिक्षकांचे पुरस्कार रुपी पाठबळ देखील कर्मचा-यांचे मनोबल वाढण्यास कारणीभूत ठरत असते. 

जुन्या वादातून 4 एप्रिल रोजी मुसेफ उर्फ संभा शेख इसाक (37) रा. शिवाजी नगर हुडको जळगांव याची अझरुद्दीन उर्फ अज्जु शेख रा. शिवाजी नगर हुडको – जळगांव याने जुन्या वादातून चाकूने भोसकून हत्या केली होती. याप्रकरणी जळगाव शहर  पोलिस स्टेशनला गु.र.न. 85/22 भा.द.वि. 302 नुसार नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी अझरुद्दीन उर्फ अज्जु यास पोलिस उप निरीक्षक सुधाकर लहारे, सफौ अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, पोना प्रितम पाटील, राहुल पाटील, चालक पोकॉ मुरलीधर बारी आदींनी अटक करण्याकामी सहभाग घेतला. संशयीतास सदर पथकाने शिवाजी नगर भागातील धनाजी काळे नगरातून अटक केली. पुढील तपासकामी त्याला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here