पादचा-याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा

jain-advt

जळगाव : महामार्गाने मार्गक्रमण करणा-या पादचा-यास ठोस मारुन अपघाती मृत्यूस कारणीभुत ठरणा-या कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 एप्रिल रोजी रघुनाथ जयराम चव्हाण (55) रा. हरिविठ्ठल नगर बस स्टॉपजवळ जळगाव जळगाव भुसावळ महामार्गावरील संगम बेकरी, हिंदुस्तान गॅस एजन्सी जवळून पायी पायी जात होते. त्यावेळी दुपारी चार वाजेच्या सुमारास मारोती इको या कार (एमएच 19 एएक्स 9407) वरील चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचे निधन झाले. धडक दिल्यानंतर सदर कारवरील चालकाने कारसह तेथून पलायन केले. दरम्यान परिसरातील एका रिक्षा चालकाने त्यांना मयत अवस्थेत सामान्य रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेप्रकरणी कारचालकाविरुद्ध कुणाल रघुनाथ चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दिपक जगदाळे व दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here