चाळीसगावला 82 लाखांचा गुटखा जप्त

जळगाव : संशयास्पद अवस्थेत भरधाव वेगातील कंटेनरला अडवून केलेल्या तपासणीदरम्यान चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाला सुमारे 82 लाख 25 हजार 100 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला आहे. मालेगाव रस्त्यावरील बेलगंगा कारखान्यानजीक 4 एप्रिल रोजी सदर कंटेनर ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी कंटेनर चालकास अटक करण्यात आली असून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 एप्रिल रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक मालेगाव रोडवर तपासकामी गेले होते. दरम्यान बेलगंगा कारखान्याजवळ एक भरधाव वेगातील कंटेनरचा (एचआर 38 एबी 6096) पोलिस पथकाला संशय आला. सदर कंटेनरला पाठलाग करुन अडवण्यात आले. कंटेनरचे लॉक उघडून पाहणी पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात एकूण 130 प्लास्टीकची पोती आढळून आली. त्या पोत्यांमधे 82 लाख 25 हजार 100 रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत तसेच कंटेनरचे मुल्य 20 लाख असा एकुण 1 कोटी 2 लाख 25 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोना नितीन किसन आमोदकर, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना शांताराम सिताराम पवार, पोना प्रेमसिंग राठोड यांच्या पथकाने तपासकामात सहभाग घेतला. पोना नितीन किसन आमोदकर यांच्या फिर्यादवरुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक लोकेश पवार करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here