अभिनेत्रीच्या मोबाईलची चोरी

jain-advt

मुंबई : मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत पबमधे पार्टी करणा-या अभिनेत्रीचा एक लाख रुपयांचा मोबाईल चोरी झाल्याप्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री तथा गायिका गरिमा जैन (28) हिने सदर मोबाईल चोरीची तक्रार दिली आहे.

गरिमा ही 2 एप्रिल रोजी तिच्या मित्रांसोबत रात्रीच्या वेळी पबमधे पार्टी करण्यासाठी गेली होती. रात्रभर पार्टी एन्जॉय केल्यानंतर गरिमा पहाटे सव्वातीन वाजता पबमधून बाहेर पडली. तिच्या एका मैत्रीणीने तिला फोन केला असता तो उचलला नाही. त्यानंतर फोन चोरी झाल्याचे उघड झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here