प्रियकरासोबत पळून विवाहीतेने केला अपहरणाचा बनाव

पुणे : प्रियकराबरोबर पळून गेलेल्या विवाहीतेने बदनामीची भिती लक्षात घेत केलेला अपहरणाचा बनाव उघड झाला. प्रियकरासोबत विवाहिता रफूचक्कर झाल्यानंतर पतीने तिच्या अपहरणाची पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस तपासात नारायणगाव येथील वैद्य वस्तीतील हा प्रकार उघड झाला. दीड वर्षापूर्वी लग्न झाले तरी देखील विवाहितेचे आपल्या प्रियकरासोबत संपर्क सुरुच होता. प्रियकरासोबत पळून जाण्याचा तिने बेत आखला. मात्र पळून गेल्यास माहेरसोबतच सासरी आपली बदनामी होईल असा देखील तिने विचार केला. यावर जालीम उपाय म्हणून तिने प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर आपल्या अपहराणाचा बनाव रचला.

पुर्वनियोजीत कार्यक्रमानुसार तिने प्रियकराला कारसह बोलावून घेतले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत तो कारमधून बाहेर तिच्याजवळ आला. त्यानंतर त्याने तिला बळजबरी कारमधे बसवून पलायन केले. हा सर्व बनावटी प्रकार तिने पतीला कथन केला. याप्रकरणी पतीने पोलिस स्टेशनला तिच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवत सीसीटीव्हीची मदत घेत कारच्या मूळ मालकाची माहिती घेतली. ती कार बेल्हा रोडने नगरकडे गेल्याचे तपासात दिसून आली. कार मालकाने ती कार महेश लोखंडे व राहुल कनगरे (रा. राहुरी) हे दोघे नगरला घेऊन गेल्याचे पोलिसांना सांगितले व सायंकाळी पाच वाजता परत आणून देणार असल्याचे देखील पुढे सांगितले. त्या माहितीच्या आधारे कार परत देण्यासाठी येण्यापुर्वी सापळा रचून ठेवला. कारमालकाला त्याची कार परत देण्यासाठी येताच विवाहीतेच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर खरा प्रकार उघड झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, सपोनि पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप – निरीक्षक दुर्वे, पो. कॉ. सचिन कोबल, शैलेश वाघमारे, पो. ना. दिनेश साबळे, दीपक साबळे, होमगार्ड अक्षय ढोबळे यांनी या तपासकामात सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here