मोबाईल व रोख रक्कम लुटीप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : महामार्गावर तरुणाकडून मोबाईल व रोख सातशे रुपयांची लुट केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुभव सौरभ नायक असे फिर्याद दाखल करणा-या तरुणचे नाव आहे.

मार्केटींगचे काम करणारा अनुभव सौरभ नायक(26) रा. शिव कॉलनी जळगाव हा तरुण 6 एप्रिल रोजी महामार्गाने जात असतांना हुंडाई शो रुमनजीक दोघा मोटार सायकलवरीक तरुणांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व सातशे रुपये जबरीने काढून घेतले. या घटनेप्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि.किशोर पवार पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here