जळगावात रविवारी विश्वशांती दौड -2022 चे आयोजन

जळगाव : श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती 2022 जळगाव तर्फे जळगाव येथे रविवार दि. 10 एप्रिल रोजी विश्वशांती दौड आयोजीत करण्यात आली आहे. जळगाव सराफ असोसिएशनचे सचिव तथा शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या 2621 व्या जन्मकल्याणक समितीचे अध्यक्ष स्वरुपकुमार लुंकड यांच्या अख्त्यारीत या दौडसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी साडे सहा वाजता काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान येथून या दौडला सुरुवात होणार आहे. नवीन बस स्थानकानजीक असलेल्या चिमुकल्या श्रीराम मंदीरापर्यंत सदर दौड राहणार आहे. या दौडच्या आयोजनाची जबाबदारी जय आनंद युवाशक्ती फाऊंडेशन घेत आहे. या दौडमधे सहभागी होणा-या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 8830988424 तसेच 9156497799 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

या महोत्सव समितीच्या माध्यमातून याच दिवशी रविवारी सकाळी सात ते आठ दरम्यान जीवदया संस्कार सामग्रीचे कॉंग्रेस भवन येथे वितरण केले जाणार आहे. सदर कार्यक्रमाची आयोजन व्यवस्था जीतो लेडीज विंग महावीर ज्वेलर्स यांच्याकडून करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता “प्रभु महावीर की 36 बाते” या कार्यक्रमाचे स्वाध्याय भवन येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समरथ महिला मंडळाकडून केले जात आहे. दुपारी पावणेचार वाजता अनोखी अंताक्षरी या कार्यक्रमाचे स्वाध्याय भवनातच आयोजन करण्यात आले असून जबाबदारी लुक एन लर्न मार्फत घेतली जात आहे. दुपारी चार ते पाच दरम्यान महाजन वाडी – नवी पेठ येथे शाश्वत नवकार महामंत्र जाप केला जाणार असून या कार्यक्रमाची व्यवस्था नुतन भावना मंडळाकडून केली जात आहे. त्यानंतर दुपारी चार ते साडे सहा वाजेदरम्यान फन फेअर मेळाव्याचे आयोजन कोठारी मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. या मेळाव्याचे आयोजन वीरती वृंद गृपकडून केले जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here