कंटेनरमधे विजप्रवाह उतरल्याने चालक मृत्युमुखी

jain-advt

जळगाव : कंटेनर पार्क करत असतांना इलेक्ट्रीक डीपीचा अंदाज न आल्याने झालेल्या धडकेत वाहनात विज पुरवठा उतरला. कंटेनरमधे इलेक्ट्रीक डिपीतून अचानक विज प्रवाह आल्याने झालेल्या दुर्घटनेत कंटेनर चालकाचा मृत्यु झाला. जगदीशसिंंह बोरा (40) असे मृत्युमुखी पडलेल्या टॅंकर चालकाचे नाव आहे. सकाळी खेडी पेट्रोल पंपानजीक सदर दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली.

आरजे 09 जीसी 2597 टॅंकर वरील चालकाला डीपीत स्फोट झाल्याचा आवाज सुरुवातीला आला. त्यानंतर त्याने खाली उतरुन डीपीत काय झाले हे बघून पुन्हा टॅंकरमधे चढण्याचा प्रयत्न करत असतांना अचानक स्फोट झाला. टॅंकरमधे विजप्रवाह उतरल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मयत घोषित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here