भावाचा अपमान करणाऱ्या तरुणाची हत्या 

crimeduniya
[email protected]

नाशिक : मुलींना मोबाईलमधील फोटो का दाखवतो, इथून निघून जा असे मुलींसमोर अपमानास्पद वक्तव्य करणा-या तरुणाची अपमान झालेल्या तरुणाच्या भावाने चाकूने वार करत हत्या केली. या घटनेप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव सुहास जाधव (26) रा. उत्कर्ष नगर गंगापूर रोड नाशिक असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उत्कर्षनगर परिसरात स्टेज तयार करण्याचे काम सुरु होते. त्याठिकाणी अजिंक्य जाधव हा त्याच्या काही मैत्रीणींना त्याच्या मोबाईलमधील फोटो दाखवत होता. त्यावेळी तेथे आलेल्या रमेश नारायण ताठे (30) याने त्याला हटकले. तु मुलींना मोबाईल का दाखवतो, इथून निघून जा असे म्हणत त्याचा अपमान केला. झालेला अपमान जिव्हारी लागल्याने अजिंक्यने हा प्रकार त्याचा भाऊ गौरव यास सांगितला. भावाचा अपमान सहन न झाल्याने गौरव याने हातात चाकू घेत रमेश ताठे याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रमेश जखमी झाला. उपचार घेत असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितास 17 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here