प्राणघातक हल्ल्यात प्रियकर ठार प्रेयसी जखमी

गेवराई : पत्नीचे अनैतिक संबंध सहन न झाल्याने पतीने केलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात पत्नी जखमी तर तिचा प्रियकर ठार झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली. बबन ज्ञानोबा खरखाडे (45) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हल्ला करणारा संशयीत आरोपी रामेश्वर गिते हा घटनेनंतर स्वतःहून शेवगाव पोलिस स्टेशनला हजर झाला.

गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. तळणेवाडी येथील रामेश्वर गिते याच्या पत्नीचे मयत बबन खरखाडे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयीत आरोपीस संशय होता. त्या संशयातून त्याने बबनवर हल्ला केला. त्या हल्ल्यात तो ठार झाला. गेवराई पोलिस स्टेशनचे पथक माहिती मिळतच घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here