मुलीसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणा-या आरोपीस तिन वर्ष कारावास

औरंगाबाद : लग्नास नकार देणा-या अल्पवयीन मुलीची वाट अडवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाला तीन वर्षे सक्तमजुरीसह विविध कलमाखाली अडीच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी सुनावली आहे. ठोठावली. अमोल रामदास गायके (22) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत 14 वर्षाच्या मुलीने फुलंब्री पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक कल्पना राठोड यांनी तपास पुर्ण केला. सहायक सरकारी लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी पाच साक्षीदारांच्या जवाबाची नोंद केली. सर्व साक्षीदार फितुर झाले तरी देखील फिर्यादीच्या जबाबाकडे दुर्लक्ष करता येत नसल्यामुळे तडजोड पत्र ग्राह्य धरु नये, अशी विनंती अ‍ॅड. बांगर यांनी न्यायालयाकडे केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षी – पुरावे विचारात घेत न्यायालयाने आरोपी अमोलला दोषी ठरवले. पोक्सोचे कलम 8 आणि भादंवि कलम 354 नुसार त्याला तिन वर्ष सक्तमजुरीसह दोन हजार रुपये दंड तसेच पोक्सोचे कलम 12 नुसार एक वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here