डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून वेटरची हत्या

अमरावती : वेगवेगळ्या हॉटेलमधे काम करणा-या दोघा वेटरमधील वादाची परिणीती हत्येत झाली. तिन दिवसांपुर्वी या दोघा वेटरमधे किरकोळ कारणातून वाद झाला होता. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी एकाने दुस-या झोपलेल्या वेटरच्या डोक्यात वेव्हर ब्लॉक घालून त्याची हत्या केली. शुक्रवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरी वेटरला अटक केली आहे.

नीलेश गणेश खाडे (32), रा. शिराळा असे मयत वेटरचे तर बाल्या केशव भिंगरे (48), रा. अंजनगाव बारी असे मारेकरी वेटरचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास नीलेश हॉटेलमधे झोपेत असतांना बाल्या भिंगरेने त्याच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक (दगड) घातला. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here