पोलिसांच्या वाहनाची चावीच काढून घेतली टारगटांनी

जळगाव : गस्तीवरील पोलिसांच्या चारचाकी वाहनाची चावीच टारगट तरुणांनी काढून घेतल्याची घटना जळगाव शहरात शनिवारी रात्री घडली. वाहनाची चावी मिळाल्याशिवाय येथून पोलिस हलणार नाही असा पवित्रा सहायक पोलिस अधिक्षक डॉ. कुमार चिंता यांनी यावेळी घेतला. सुज्ञ नागरिकांनी मशीदीच्या भोंग्यावरुन सुचना केल्यानंतर काही वेळाने पोलिस वाहनाची चावी मिळाली. मात्र अगोदरच उशिरापर्यंत सुरु असलेल्या हातगाडीच्या विषयावरुन असलेल्या तणावात या चावी प्रकरणामुळे अधिकच भर पडली होती.

जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरु असतात. या परिसरात एका खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर वाद सुरु असल्याचे समजल्यानंतर काही वेळातच पोलिसांचे वाहन आले. गोंधळाचा फायदा घेत काही टारगट तरुणांनी पोलिसांच्या चारचाकी वाहनाची चावी काढून घेतली. वाहनाची चावी कुणीतरी खोडसाळपणा करत काढून घेतल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस पथक चिडले. हातगाडीवर सुरु असलेला वाद आणि वाहनाची चावीचा विषय लक्षात घेत अधिक पोलिस फौज मागवण्यात आली. काही वेळाने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. वाहनाची चावी मिळाल्याशिवाय कुणीही येथून जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. वाद वाढण्यास कारणीभूत ठरलेल्या एका आमलेट गाडीवर यावेळी कारवाई करण्यात आली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here