अभिनेत्याच्या मुलीला केले ब्लॅकमेल , तरुण अटकेत

On: August 1, 2020 10:08 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला तिच्या खासगी फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणास मुंबई क्राईम ब्रँचने जेरबंद केले आहे. अभिनेत्याच्या मुलीच्या काही खाजगी फोटोंवरून 25 वर्षांचा तरुण तिला ब्लॅकमेल करत होता. तो तरुण तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाही तर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने तिला दिली होती.

मुंबईतील मालाड परिसरातील राहणारा कुमैल हनिफ पटाणी असे त्याचे नाव आहे. क्राइम ब्रँचच्या युनिट 11 ने त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. त्याच्यावर भा.द.वि.च्या विविध कलमांन्वये (महिलेचा विनयभंग आणि खंडणी मागण्याविरोधात) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीची बहिण आणि पीडित तरुणी या दोघी एकाच महाविद्यालयात शिकत होत्या. त्यामुळे त्यांची ओळख होती. या तरुणाने अभिनेत्याच्या मुलीला इन्स्टाग्रामवर एक संदेश दिल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. आरोपीने तिला संदेशात म्हटले आहे की, तो कॉलेजमध्ये असल्यापासून तिला ओळखतो. तेव्हापासून तिचे काही खाजगी फोटो त्याच्याकडे होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment