जळगाव : गाडेगाव नेरी येथील शशीप्रभा हॉटेलमधे झालेल्या देशी विदेशी मद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सदर कारवाई केली असून दोघा चोरट्यांना पुढील तपासकामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण (22) रा. मच्छी मार्केट सुप्रिम कॉलनी जळगाव आणि सागर लक्ष्मण वाधवाणी(20) रा. बाबा नगर सिंधी कॉलनी जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
18 एप्रिल 2022 रोजी रात्री दहा ते दिनांक 19 एप्रिल 2022 दरम्यान गाडेगाव नेरी येथील शशीप्रभा हॉटेलच्या शटरचे कुलुप तोडून 1 लाख 10 हजार 245 रुपये किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा चोरी झाला होता. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक शिवाजी दौलत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगारांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण आणि सागर लक्ष्मण वाधवानी या दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीअंती दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 54 हजार 567 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात अजून तिघे साथीदार असल्याचे पोलिसांच्या ताब्यातील दोघांनी कबुल केले आहे. दिनकर उर्फ पिण्या हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द एकुण सोळा गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सचिन पाटील, नाना तायडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. ताब्यातील जप्त मुद्देमालासह दोघांना पुढील तपासकामी जामनेर पोलिस स्टेशनचे पो.ना. अतुल पवार, पो.ना. राहुल पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई जामनेर पोलीस करत आहेत.