वरली मटका अड्ड्यावर जळगावात छापा कारवाई

जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण अशोक किराणा परिसरात सुरु असलेल्या वरली मटका अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या छापा कारवाईत दहा ते बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 19 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेनंतर केलेल्या या कारवाईत एकुण 6300 रुपये रोख रक्कम आणि सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सिराज सैय्य्द रफीयोद्यीन सैय्यद (49), रा. शेरा चौक, मास्टर कॉलनी, शेख जावेद शेख सलीम (28) रा. अशोक किराणा चौक, रामेश्वर कॉलनी जळगाव, अरुण सुपडू भदाणे (50) रा. तलाठी कार्यालयाजवळ मेहरुण जळगाव, विजय रामभाऊ सोनवणे (60) राम नगर जळगाव, पंकज अरुण महाजन (23) गोपाल फॅन्सी दुकानाजवळ, तृप्ती कॉर्नर जवळ अयोध्या नगर जळगाव, सुपडू चावदस सपकाळे (42) रा. सुनसगाव ता. भुसावळ जि. जळगाव, अजय ज्ञानेश्वर कोळी (35) रा. महादेव मंदीराजवळ मोहाडी जळगाव, मजीत शेख बाबु शेख (46) अशोक किराणा चौक रामेश्वर कॉलनी जळगाव, कडू राजाराम परखड रामेश्वर कॉलनी जळगाव, जगदीश शाम पाटील (36) पाणी पुरवठा ऑफीस जवळ, लियाकत अली अजगर अली (53) लक्ष्मी नगर जळगाव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम व सट्टा जुगाराचे साहित्या जप्त करण्यात आले आहे. छगन जनार्दन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) सह भादवि कलम 109 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. आनंदसिंग पाटील, पो.ना. गणेश शिरसाळे, पो.ना. सचिन पाटील, पो.ना. चेतन सोनवणे, पो.कॉ. चंद्रकांत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here