नगर एसपी कार्यालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

नगर : फिर्याद घेण्यास फिरवाफिरव होत असल्याचा आरोप करत महिलेने एसपी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी श्रीगोंदा येथील सदर महिलेविरुद्ध भिंगार कॅंप पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तोफखाना पोलिस स्टेशनचे कर्मचारी शफी सलीम शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

बुधवारी दुपारच्या वेळी सदर महिला सायबर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. पवन बबन शिंदे ही व्यक्ती तिचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करत असल्याबाबत तिची तक्रार होती. ती महिला आधी बेलवंडी पोलिस स्टेशनला गेली. तेथे तिला सायबर पोलिस स्टेशनला जाण्यास सांगण्यात आले. सायबर पोलिसांनी सदर तक्रार आमच्या पोलिस स्टेशन अंतर्गत येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे वैतागून सदर महिलेने एसपी कार्यालयाच्या पाहिल्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस नाईक व्ही. सी. गंगावणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here