रुग्णाला दाखल करुन घेण्याच्या हट्टापायी डॉक्टरला मारहाण

औरंगाबाद : रुग्णाला दाखल करुन घेण्याची आवश्यकता नसतांना देखील दाखल करुन घेण्याचा हट्ट एका राजकीय कार्यकर्त्याने घाटी रुग्णालयात केला. रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांचे मत असतांना देखील एमएसचे शिक्षण घेणा-या डॉक्टरला मारहाण देखील करण्यात आली.

या प्रकारामुळे तणावात आलेल्या डॉक्टरांनी रात्री उशीरापर्यंत कामकाज ठप्प केले होते. मात्र या घटनेची कुणी पोलिस तक्रार केली नाही. काही राजकीय कार्यकर्त्यांनी एका पन्नास वर्ष वयाच्या व्यक्तीला अपघात विभागात दाखल करुन घेण्याच्या उद्देशाने आणले होते. त्याला दाखल करुन घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. मात्र दाखल करुन घेण्याची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांचे मत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here