जळगावचा सुभाष चौक अतिक्रमणाच्या विळख्यात

जळगाव : जळगाव शहरातील सुभाष चौक परिसर “हार्ट ऑफ द सिटी” समजला जातो. या परिसरात महाननगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने लक्ष देण्याची गरज गेल्या कित्येक वर्षापासून निर्माण झाली आहे. मात्र एखादी संवेदनशिल घटना घडली म्हणजे मलमपट्टी केल्यागत हा विभाग तेवढ्यापुरता कारवाई करतो. त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी गंमत सुरु होते.

सुभाष चौक ते घाणेकर चौक दरम्यान भाजीपाला विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन जागा व्यापलेली दिसून येते. या रस्त्याने पायी चालणे तसेच वाहन चालवणे म्हणजे जणूकाही सर्कशीतील कलाकारांच्या कसरतीसमान प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. या परिसरात हॉकर्स झोन तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याची वेळोवेळी घोषणा होते. अधूनमधून हॉकर्स झोनबाबत कारवाई होते. मात्र ती कारवाई तेवढ्यापुरता असते. अधूनमधून मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाची ट्रक या रस्त्यावर येत असते. मात्र ही ट्रक मोठी जागा व्यापून काही तास उभी असते. मात्र समांतर पातळीवर अतिक्रमणधारक देखील आपला व्यवसाय बिनबोभाटपणे करत असल्याचे दिसून येत असते. त्यामुळे या अतिक्रमणधारक विक्रेत्यांना या विभागाचे अभय असल्याचे लोक खुलेआम बोलत असतात. या रस्त्याने लोकांना सुखाने किमान पायी चालता यावे एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हॉकर्स झोनची कायमस्वरुपी अंमलबजावणी व्हावी अशी  देखील अपेक्षा व्यक्त केली जात  आहे.         

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here