पोलिस विभागात 7 हजार पदे भरणार : उपमुख्यमंत्री पवार

नाशिक : आगामी काळात महाराष्ट्र पोलिस दलात 7 हजार 231 पदांची भर्ती केली जाणार असल्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या 119 व्या दिक्षांत समारंभात बोलतांना पवार यांनी सदर घोषणा केली आहे.

पोलिस दल बळकट करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात 1 लाख पोलिस कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न सोडवला जाणार आहे. त्यासाठी सुमारे 737 कोटी रुपयांची तसेच इतर पायाभूत सुविधा, इमारतींसाठी 1 हजार 29 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचे देखील उप मुख्यमंत्री पवार यांनी यावेळी म्हटले. कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता समाजातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here