जावयाने केला सासऱ्याचा खून

तेल्हारा : पत्नीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथे उघडकीस आली आहे.  रविवारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटने प्रकरणी पोलिसांनी निलेश विठ्ठल धुरंदर या संशयीत आरोपीस अटक केली आहे.

नीलेश विठ्ठल धुरंदर (35) रा. उमरी, ता तेल्हारा हा पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी आला होता. मात्र तिने येण्यास टाळाटाळ केली. आता वडिल घरी नाहीत ते आल्यावर बघू असे म्हणत तिने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. काही वेळाने त्याचे सासरे गजानन पवार हे घरी परत आले. मात्र सासऱ्याने जावई निलेश सोबत वाद घातला. रविवारच्या पहाटे गजानन पवार यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. तेल्हारा पोलिसांनी पाथर्डी येथे धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. संशयीत निलेश यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here