आतेबहिणींचा मामेभावांनी केला विनयभंग

खामगाव : मामेभावाकडून आजीला होत असलेली मारहाण बघून समजावण्यासाठी गेलेल्या आते बहिणींचा विनयभंग करण्यात आला. तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे 19 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील जावरा येथील महिला तिच्या आजीची भेट घेण्यासाठी बहिणींसह हिंगणा कारेगाव येथे आली होती. महिलेचा मामेभाऊ अक्षय गोविंदा जाधव हा आजीला मारहाण करत होता. त्यामुळे त्याची समजूत घालत असतांना अक्षयने तिला शिविगाळ केली. तसेच अरविंद यशवंत जाधव, संजय मनोहर जाधव, अशोक साहेबराव जाधव, अक्षय गोविंदा जाधव, अतुल शिवाजी जाधव, लखन शिवाजी जाधव (सर्व रा.हिंगणा कोरेगाव) या सर्वांनी त्या महिलेसह तिच्या बहिणीचा हात धरला. दोघींच्या गळ्यातील पोत हिसकावून घेत विनयभंग केला. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here