झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर आसोदा गावी छापा

जळगाव : तालुक्यातील आसोदा या गावी सुरु असलेल्या झन्नामन्ना या सट्टा जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 2500 रुपये रोख, सट्टा जुगाराचे साहित्य व मोटार सायकली असा एकुण 1 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

एका अल्पवयीन मुलासह इतरांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, पद्माकर पुरुषोत्तम कोळी व इतर सहा ते सात जणंविरुद्ध सदर कारवाई करण्यात आली. आसोदा गावी आव्हाने रस्त्यावरील विट भट्टीजवळ सदर जुगार सुरु होता. मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here