चारचाकी वाहनाच्या जबर धडकेत एक ठार

जळगाव : सकाळी पायी चालणा-या दाम्पत्याला भरधाव वेगातील टाटा मॅजीक या वाहनाने दिलेल्या जबर धडकेत एकाचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी घडली. गफ्फार सुलेमान पिंजारी असे मृत्यु झालेल्या पादचा-याचे नाव आहे. अजिंठा रस्त्यावरील नेक्सा शो रुम नजीक आज 25 एप्रिल रोजी सकाळी सदर घटना घडली.

गफ्फार सुलेमान पिंजारी व त्यांची पत्नी रईसाबी गफ्फार पिंजारी हे दाम्पत्य पायी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अजिंठा रस्त्यावरील नेक्सा शो रुम नजीक टाटा मॅजीक (एमएच 20 बीवाय 9034) या भरधाव वाहनाने दोघांना धडक दिली. या धडकेत गफ्फार पिंजारी हे मोठ्या प्रमाणात जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जखमी गफ्फार पिंजारी यांचा मुलगा घटनास्थळी आला. गर्दीतील लोकांच्या मदतीने जखमी गफ्फार पिंजारी यांना धडक देणा-या वाहनातून सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून गोदावरी हॉस्पीटल येथे नेण्यात आले. औषधोपचार सुरु असतांना त्यांचे निधन झाले. याप्रकरणी अपघातास व मृत्युस कारणीभुत ठरलेल्या टाटा मॅजीक वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here