वकीलास पेटवण्याचा प्रयत्न करणारा वृद्ध ताब्यात

जळगाव : जुना दिवाणी खटला चालवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या वृद्ध पक्षकाराने वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना चाळीसगाव न्यायालयाच्या व्हरांड्यात 26 एप्रिल रोजी घडली. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने इतर वकील बांधवांनी धाव घेत संभाव्य घटनेला अटकाव केला. किसन मोतीराम सांगळे या वयोवृद्धाच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसन सांगळे या वयोवृद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस करत आहेत.

अ‍ॅड. सुभाष तोताराम खैरनार यांनी या घटनेप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की सन 2010 ते 2013 या कालावधीत किसन सांगळे यांचा दिवाणी वाद असलेला खटला चालवला होता. या खटल्यात अ‍ॅड. खैरनार यांनी सांगळे यांच्या बाजूने मनाई हुकूम पारित करुन देण्यात आला होता. त्यानंतर दुस-या जमीनीच्या दिवाणी दाव्याकामी त्यांनी कामकाज करण्यास नकार देत दुसरा वकील नेमण्यास सांगीतले होते. अ‍ॅड. खैरनार यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून वकील बांधवांनी या घटनेचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here