महिला पोलिस उप निरीक्षकाच्या रिव्हॉल्वरची चोरी

अकोला : अकोला येथील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या राहत्या घरातून चोरट्यांनी त्यांचे सर्व्हिस रिव्हाल्वर तसेच जिवंत काडतूस चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

सरिता कुवारे असे सदर महिला पोलिस उप निरीक्षकांचे नाव आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक सरिता कुवारे सिटी या 21 ते 25 एप्रिल दरम्यान सुटीवर गेल्या होत्या. सुटी संपल्यानंतर त्या घरी परतल्या. ड्युटीवर जाण्याची तयारी करत असतांना आपले रिव्हाल्व्हर आणि जिवंत काडतुस चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here