पाच रुपयाचा वाद, वडापाव विक्रेत्याने ग्राहकास केले बाद

नगर : भजी प्लेट 15 रुपयांऐवजी 20 रुपयांना लावल्यामुळे झालेल्या वादात विक्रेत्यासह त्याच्या साथीदारांकडून ग्राहकाची हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी नगर एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण सहा जणंविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पप्पू ऊर्फ प्रवीण रमेश कांबळे (35), रा. दत्त मंदिराजवळ, बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल बाबासाहेब सोनवणे, अमोल भाऊसाहेब साळवे (दोघे रा. रोकडे मळा, वडगाव गुप्ता रोड, नवनागापूर), पुरुषोत्तमकुमार गुप्ता, अरुण नारद शहा, संकेत विठ्ठल सोमवंशी (तिघे रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) व बबड्या ऊर्फ बाबासाहेब केरू गव्हाणे (रा. रोकडे मळा, नवनागापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here