पीएमआरडीए अँडव्होकेट्स असोसिएशनची कार्यसमिती जाहीर

पुणे : पीएमआरडीए या संस्थेच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड जाहीर झाली. असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत जाहीर झालेल्या कार्यसमितीत अँड. सागर नेवसे यांची अध्यक्षपदी निवड झाली. अँड. सुभाष वीर यांची उपाध्यक्षपदी तर अँड. अविनाश पाठक सचिव, अँड. राजेश निततनवरे खजिनदार आणि सदस्य म्हणून अँड मनप्रित अरोरा, अँड सारिका परदेशी, अँड. सीमा साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहराची वाढलेली हद्द, त्याचा नियोजनबद्ध विकास यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. पीएमआरडीएच्या माध्यमातून पुण्याचा विकासाला मोठी चालना भविष्यात मिळणार आहे. आज कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाला कायदेशीर मदत करण्याकामी, हरकती असणारे शेतकरी, त्यांना व या कामाशी संबंधित सर्व वकिलांना मदत करण्याचे कार्य पीएमआरडीए अँडव्होकेट्स असोसिएशन या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here