क्रिकेट खेळाडू नचिकेत ठाकूरची निवड

जळगाव : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अंडर-19 बॉईज कॅम्प-2022 साठी निवड झाली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) अधिकृत क्रिकेट अकादमी आहे आणि महान भारतीय फलंदाज, व्हीव्हीएस लक्ष्मण हे अकादमीचे सध्याचे क्रिकेट प्रमुख आहेत. संपूर्ण भारत वर्षातून निवडक मुलांची या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे महाराष्ट्रातून एकूण 5 खेळाडूंनी निवड करण्यात आली त्यात नचिकेत ठाकूर ची निवड ही निश्चित पणे जैन स्पोर्टस अकादमी व जळगांव जिल्हा साठी गौरवास्पद बाब आहे.

हे शिबिर 9 मे ते 2 जून 2022 दरम्यान होणार आहे. नचिकेत हा NCA शिबिरात सहभागी होणारा जैन स्पोर्ट्स अकादमीचा चौथा खेळाडू आहे. या निवडीसाठी जैन स्पोर्टस अकादमी चे संचालक श्री अतुल जैन, क्रीडा समन्वयक श्री अरविंद देशपांडे मुख्य प्रशिक्षक श्री सुयश बुरकुल, मुश्ताक अली, तन्वीर अहमद, राहुल, वरुण घनश्याम तसेच सर्व खेळाडूंनी नचिकेत चे हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here