दोघे मोटार सायकल चोरटे जेरबंद

जळगाव : मोटार सायकल चोरी करणा-या दोघा चोरट्यांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी अटक केली आहे. रुपेश अविनाश कोळी (30) रा. जळगाव खुर्द ता. जि. जळगाव आणि विनोद काशीराम तायडे (34) रा. साकरी फाट्याजवळ भुसावळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.

गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोघा चोरट्यांना जळगाव खुर्द येथून चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले. दोघांना पोलिस स्टेशनला आणून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. गुन्हे शोध पथकातील तेजस मराठे, योगेश इंधाटे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, गजानन बडगुजर, प्रफुल्ल धांडे, रतनहरी गिते, राजकुमार चव्हाण, योगेश पाटील व योगेश बोरसे आदींनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या कारवाईत सहभाग घेतला. जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल असलेला गु.र.न. 106/22 भा.द.वि. 379, 34 हा उघडकीस आला असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविंद्र हिलाल इंदवे यांच्या ताब्यातील रेल्वे स्टेशन परिसरात आरआरआय कॅबीन परिसरात पार्क केलेली मोटार सायकल दोघा चोरट्यांनी 23 एप्रिल रोजी चोरुन नेली होती.      

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here