गुंगीचे औषध देऊन दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा  

अमरावती : पहिले लग्न झाले असतांना ते लपवून ठेवले. तसेच तरुणीला गुंगीचे औषध देत अमरावतीला आणून तिच्यासोबत विवाह संस्थेत लग्न केल्याच्या आरोपाखाली विवाहीत तरुणाविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज नानाजी मानतकर (वार्ड क्रमांक 6 नांदगाव खांडेश्वर अमरावती) असे तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपी तरुणाचे नाव आहे.

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तीचा मनोज मानतकरसोबत परिचय झाला होता. तिची शैक्षणिक कागदपत्रे त्याच्याजवळ होती. कागदपत्र परत करतो अशी बतावणी करत त्याने तिला अमरावतीला आणले. 28 एप्रिलच्या दुपारी त्याने तिला गुंगीचे औषध देत जीवे ठार करण्याची धमकी देत काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्यानंतर पुन्हा नांदगाव येथे सोडून दिले. त्यानंतर व्हाटस अ‍ॅपवर तिला तिच्या व मानवतकरच्या लग्नाचे प्रमाणपत्र दिसले. मनोज हा अगोदरच विवाहित असताना त्याने फसवून आपल्यासोबत लग्न केल्याप्रकरणी 30 एप्रिल रोजी नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनला त्याच्यासह अजून एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here