अल्पवयीन मुलीशी विवाह करणा-या अभियंत्याचा फेटाळला जामीन

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबध ठेवणाऱ्या नगर जिल्ह्यातील अभियंता पतीचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे. अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणा-या अभियंत्याला भा.द.वि. 375 (2) प्रमाणे पती पत्नी या नात्याची सवलत मिळणार नसून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद झाला असल्याचे न्या. विभा कंकणवाडी यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना कालावधीत 3 जुलै 2021 रोजी अल्पवयीन मुलीसोबत हे लग्न लावण्यात आले होते. याप्रकरणी अभियंता पतीसह त्याचे आई वडील व सासु सासरे यांच्याविरुद्ध पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. याशिवाय पतीविरुद्ध बलात्काराचा अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नानंतर पिडीत मुलीने महिला व बालकल्याण विभागाकडे तक्रार केली होती. बालकल्याण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भा.द.वि. 376 (एन), 323 504, 506 आणि पोक्सो कायदा कलम 4, 5 (एल), 6 आणि 8 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्यात पती व्यतिरिक्त इतरांना जामीन मिळाला असला तरी पतीला जामीन नाकारण्यात आला. त्यामुळे अभियंता पतीने खंडपिठात धाव घेत न्यायाची मागणी केली. मात्र जामीन फेटाळण्यात आला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here