पत्नीला मारहाण, मुलांना विष देत स्वत: केले प्राशन

jain-advt

अमरावती : अमरावती शहरातील नांदगाव पेठ परिसरातील विवाहीत तरुणाने पत्नीला लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. तसेच दोघा बालकांना विष पाजून स्वत: देखील विष प्राशन केले. 3 मे रोजी घडलेल्या या घटनेत अनुक्रमे 2 व 5 वर्षाच्या दोघा अत्यवस्थ बालकांवर नागपुर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनन्या व आदर्श अशी गंभीर बालकांची नावे असून महेंद्र सुभाष राऊत या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महेंद्र राऊत हा तरुण अत्यवस्थ तर त्याची पत्नी ज्योत्सना ही जखमी झाली आहे.

महेंद्र व ज्योत्स्ना या पती पत्नीत किरकोळ कारणावरुन नेहमीच वाद होत असत. 3 मे रोजी त्यांच्यात वाद झाला. या वादामुळे त्याने पत्नी ज्योत्सना हिस सळईने मारहाण केली. त्यामुळे तिने नांदगाव पेठ पोलिस स्टेशनला जाऊन पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. दरम्यान घरी असलेल्या महेंद्रने दोघा बालकांना विष देत स्वत: देखील प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here