विना परवानगी लाऊड स्पीकर लावल्यास कारवाई – डॉ. मुंढे

Dr. Pravin Mundhe SP

जळगाव – रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान लाऊड स्पीकरला परवानगी नसून ठरलेल्या वेळेत त्यावर आवाजाची मर्यादा राहणार आहे. जळगाव पोलीस दलाच्या रेकॉर्डप्रमाणे जळगाव जिल्ह्यात 663 मशिदी असून त्यापैकी 608 मशिदींना लाऊड स्पीकरची परवानगी देण्यात आली आहे. अकरा मशिदींवर भोंगे लावले नसल्याची संबंधित ट्रस्टने पोलीस दलास माहिती दिली आहे. 44 मशिदींवर लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी देण्याचे काम प्रलंबित असून ते लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

आज 5 मे रोजी सायंकाळी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लाऊड स्पीकर संदर्भात माध्यमांना माहिती दिली. पोलीस दलाकडे असलेल्या तपशिलानुसार जळगाव जिल्ह्यात एकूण 2819 मंदिरे आहेत. त्यापैकी 370 मंदिरांना लाऊडस्पीकरची परवानगी देण्यात आली आहे. मागणीनुसार अटी-शर्थीनुसार लाऊड स्पीकरची परवानगी पोलीस दलाकडून दिली जाणार आहे. विना परवानगी लाऊड स्पीकर वाजवल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here