सिलेंडरच्या स्फोटात दोघे जखमी, आगीवर नियंत्रण

जळगाव : जळगाव शहरातील भुषण कॉलनीत असलेल्या नाश्ता सेंटरमधे आज सायंकाळी सिलेंडरला आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोघे जण जखमी झाले असून आग नियंत्रणात आणली गेली. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी, होमगार्ड व अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

भुषण कॉलनीत असलेल्या सावकारे नाश्ता सेंटर आहे. या नाश्ता सेंटरमधे कामकाज सुरु असतांना सिलेंडरला आग लागल्याने एकच भडका उडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन चालक देवीदास, भगवान जाधव, वसंत कोळी यांच्यासह रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व होमगार्ड मदतीला धावून आले. या घटनेत नाश्ता सेंटर चालक ज्योती विजय सावकारे व विजय सावकारे हे दोघे जण जखमी झाले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here