चाळीसगावला डीआयजी पथकाचा जुगारावर छापा

जळगाव : विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या पथकाने चाळीसगाव येथे सुरु असलेल्या 52 पत्ते कॅट- झन्ना मन्ना जुगारावर कारवाई केली. या कारवाईत 3 लाख 71 हजार 560 रुपयांचा एकुण मुद्देमाल हस्तगत केला आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत इच्छापुर्ती मंदीरानजीक सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावरील गुलाब भिमसिंग राजपुत रा.पाटीलवाडा प्रताप चौक चाळीसगाव तसेच इतर अकरा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत रोख 1 लाख 34 हजार 60 रुपये, 11 मोबाईल (किंमत 12 हजार 500), अकरा मोटार सायकली (किंमत 2 लाख 25 हजार), तसेच जुगाराची साधने असा एकुण 3 लाख 71 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पो.नि.बापू रोहम, स.पो.नि. सचिन जाधव, सहायक फौजदार बशिर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शेख शकिल, पोलिस नाईक मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलीक, सुरेश टोगारे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here