आंतरतीय विवाह करणा-या तरुणीला नेले फरफटत

अमरावती : मुलीने केलेला आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने तिच्या घरच्या सदस्यांनी तिला पतीच्या घरातून फरफटत नेल्याची घटना उघड झाली असून खळबळ माजली आहे. मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या या घटनेचा एक व्हिडीओ देखील देखील व्हायरल झाला आहे.

मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीत अंबाडा येथील रहिवासी तरुणाने तालुक्यातील एका तरुणीसोबत 28 एप्रिल रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केला. तिच्या घरी हा विवाह मान्य नव्हता. 4 मे रोजी मुलीच्या माहेरच्या नातेवाईकांनी थेट तिच्या पतीचे घर गाठून तिला फरफटत कुठेतरी नेले आहे. तिच्या पतीने याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here