बालिकेवर सतरा वर्षाच्या मुलाचा अत्याचार

अजिंठा : शाम्पू आणून दे असे म्हणत घराजवळ राहणा-या पाच वर्षाच्या अजान बालिकेला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या सतरा वर्षाच्या विधीसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंठा येथील इंदिरानगर झोपडपट्टीत घडलेल्या या घटनेप्रकरणी अत्याचार करणा-या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पिडीत मुलीच्या आईला तिचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर तिने घराकडे धाव घेतली. दरम्यान तो मागच्या दाराने पळून गेला. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासह पिडीत बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात मुलगी व मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय मराठे, पोलिस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण आदींनी घटनास्थळी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here