महिलेची हत्या करुन रखवालदाराची आत्महत्या

अमरावती : मोर्शी तालुक्यातील दापोरी शिवारात शेतात रखवालदारीचे काम करणाऱ्या रखवालदारासोबत राहणाऱ्या महिलेचा मृतदेह झोपडीत आढळल्याने खळबळ  माजली  आहे. या झोपडीतच रखवालदारही अत्यवस्थ अवस्थेत आढळून  आला.  मात्र  उचपारादरम्यान  त्याचे  निधन झाले. महिलेस मारहाण करुन स्वत: विषारी  द्रव प्राशन करुन रखवालदाराने आपली  जीवनयात्रा  संपवल्याचे दिसून आले आहे. मोर्शी  पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद  घेण्यात आली आहे.

भोजराज धुर्वे (45) रा. कोलारी, आठनेर, मध्य प्रदेश ह. मु. दापोरी असे मरण पावलेल्या  रखवालदाराचे तर सुनीता (35), रा. कोयला, मध्य प्रदेश असे मयत महिलेचे नाव आहे. भोजराज धुर्वे हा सुनिता या महिलेसह गेल्या एक वर्षापासून विघे यांच्या शेतात रखवालदारीचे काम करुन वास्तव्याला होता. डॉक्टरांनी  दोघांना मयत घोषित केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here