अल्पवयीन मुलीवर अत्याचार – डॉक्टरला अटक

jain-advt

नांदेड : दवाखान्यात काम करण्यासाठी येणा-या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर ती गर्भवती असल्याचे उघड झाले. उपचारादरम्यान तिचा गर्भपात करण्यात आला. या घटनेप्रकरणी किनवट पोलिस स्टेशनला 7 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. विजयकुमार सुंकरवार (43) असे या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीत डॉक्टरचे नाव आहे.

अटकेतील डॉ. विजयकुमार सुंकरवार यास किनवट पोलिसांनी न्यायालयात हजर केले. अतिरिक्त सत्र न्या. एस. बी. डिगे यांनी 12 मे पर्यंत डॉ. सुंकरवार याची पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. सुंकरवर याच्या दवाखान्यात कामासाठी येणा-या अल्पवयीन मुलीच्या पोटात चार दिवसांपुर्वी त्रास सुरु झाला. तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तिचा गर्भपात करण्यात आला. मुलीला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली डॉ. सुंकरवार याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here