विनयभंगासह महिलेच्या घरात सामानाची तोडफोड

जळगाव : अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग करत तिच्या घरातील किमती सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रिम कॉलनी परिसरात राहणा-या महिलेकडे तिच्या घरातील पातेले परत देण्यासाठी 9 मे रोजी विजय मराठे या इसमाचा भाऊ आला होता. त्यावेळी त्याच्याकडे राहिलेल्या पैशांची मागणी महिलेने केली. आपल्याला पैसे मागितल्याचा राग आल्याने सदर इसमाने तुझे कसले पैसे असे म्हणत अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच विजय मराठे, आकाश जाधव, शंकर खर्चे असे सर्वजण महिलेच्या घरात आले. विजय मराठे व आकाश जाधव यांनी वस्त्र प्रावरणे फाडून मनाला लज्जा वाटेल असे अशोभनीय कृत्य केल्याचा महिलेने आरोप केला आहे.

आपल्या बचावासाठी महिलेने पातेले उचलून आकाश जाधव यास मारुन फेकले. दरम्यान विजय मराठे याचा भाऊ आणि शंकर खर्चे या दोघांनी महिलेच्या आईसह तिच्या मामाला मारहाण केली. घरातील टीव्ही, फ्रिज तसेच घराबाहेर लावलेली दुचाकी यांचे नुकसान केले. तुम्हाला या परिसरात राहू देणार नाही अशी धमकी दिल्याचे देखील महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेप्रकरणी विजय मराठे, त्याचा भाऊ, आकाश जाधव आणि शंकर खर्चे अशांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here