गांजाची चोरटी वाहतूक – दोघांना अटक

जळगाव : गांजाची चोरटी वाहतूक केल्या प्रकरणी दोघांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान अटक केली आहे. सुरुवातीला याप्रकरणी तेजस महादेव खरटमल (19) रा. जुना पावर हाऊस रोड, चाळीसगांव यास शिताफीने पकडण्यात आले. त्याने दिलेल्या कबुली नुसार त्याचा साथीदार केदार प्रल्हाद मोहिते याला देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2 किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

9 मे 2021 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, पोहेकाँ. दत्तात्रय महाजन, पोना  जयंत सपकाळे, पोना गोवर्धन बोरसे, पोना भुपेश वंजारी, पोकॉ हिराजी शिवाजी देशमुख चापोकॉ मनोहर पाटील असे शासकीय वाहनाने वाघळी दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस पथकाला एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल चाळीसगावकडुन भडगावच्या दिशेने भरधाव वेगात जातांना आढळून आली. या मोटर सायकल चालकावर पोलीस पथकाला संशय आला.  त्यांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली. त्याच्या कब्जातून 2 किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा पथकाने हस्तगत केला. या गांजाचे बाजारमुल्य 43 हजार 500 रुपये एवढे आहे. गांजासह मोटर सायकल चालक तेजस खरटमल याला मोटरसायकल व गांजासह अटक करण्यात आली. गांजा व मोटरसायकल असा एकूण 1 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सदर गांजा तेजस खरटमल याने चाळीसगाव येथील केदार प्रल्हाद मोहिते यांच्याकडून घेतला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे केदार मोहिते याला देखील अटक करण्यात आली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  संजय ठेंगे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे, पोउनि लोकेश पवार, पोहेकॉ दत्तात्रय महाजन, पोना  जयंत सपकाळे, पोना  गोवर्धन बोरसे, पोना भुपेश वंजारी, पोकॉ  हिराजी शिवाजी देशमुख, चापोकॉ मनोहर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, पोना भुपेश वंजारी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here